corona

बीड जिल्हा : आज कोरोना १८३

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी (दि.२३) कोरोनाचा आकडा १८३ इतका आहे.

गुरुवारी ३९६६ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२३) प्राप्त झाले, त्यामध्ये १८३ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३७८३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २४, अंबाजोगाई ८, आष्टी ५५, धारूर १७, गेवराई ११, केज १२, माजलगाव ५, परळी २, पाटोदा ११, शिरूर ३१, वडवणी ७ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, निर्बंध कडक करूनही कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

Tagged