remdesivir

रेमडेसिवीरचा remdesivir काळा बाजार करणार्‍यास तीन वर्षाचा सश्रम कारावास

कोरोना अपडेट क्राईम महाराष्ट्र

नागपूर : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांनी रेमेडेसिवीरचा काळा बाजार करून रुग्णांच्या जिवीताशी खेळण्याचा प्रयत्न केला. नागपूरात रेमेडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार करणार्‍या आरोपी तरुणाला विशेष न्यायालयाने तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रेमेडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार घटनांमधील हा पहिला निर्णय असून सुमारे तीन महिन्यात हा निकाली निघाला. राज्यातील ही पहिली शिक्षा असलण्याची शक्यता आहे

महिंद्रा रंगारीवर रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबारचा आरोप लावण्यात आला होता. क्रीडा चौकातील ओजस कोविड सेंटरमध्ये कार्यरत असताना 17 एप्रिल 2021 रोजी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचे रेमेडेसिवीर इंजेक्शन महेंद्रन चोरले होते. त्याची ही चोरी सीसीटीव्ही चित्रित झाला होती. तसेच चोरी गेलेले रेमेडेसिवीर इंजेक्शन त्याच्याजवळ सापडले. त्यानंतर कोविड सेंटरचे व्यवस्थापक अशोक बिसेन यांनी रंगारी विरुद्ध इमामवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यावेळी दुसर्‍या लाटेतील कोरोनाचा सर्वोच्च बिंदूवर होता. अशावेळी रेमेडेसिवीर इंजेक्शन अनेक रुग्णांसाठी जीवनावश्यक झाले होते. त्याचाच गैरफायदा करत काहीजण रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत होते. अशा असामाजिक तत्वाविरुद्ध कारवाईची मागणी होत होती. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. जनहित याचिका सुनावणीदरम्यान हा मुद्दा चर्चेला आला. यावर न्यायालयाने काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार न्यायालयाने काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर काळाबाजार करणार्‍या अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. पुढे सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणांचे खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात आणावेत असेही आदेश दिले होते.
याप्रकरणी मुख्य न्यायदंडधिकारी एस.बी पवार यांच्या समक्ष सुनवाणी झालीय.खटल्यात 12 साक्षीदार तपासण्यात आले.सरकारतरर्फे अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी बाजू मांडली. मुख्य न्यायदंडाधिकारी एस.बी. पवार यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

Tagged