क्राईम

लोकेशन दिल्याच्या संशयावरुन ग्रामस्थांना वाळू माफियाची धमकी!

By Keshav Kadam

July 24, 2021

echo adrotate_group(3);

टाकरवण दि.24 : टिप्पर पकडून दिल्यामुळे वाळू माफियाने ‘सतत माझ्या टिप्परच्या लोकेशनवर का असतात’ असे म्हणत वाळू माफियाने ग्रामस्थांना धमकी दिली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.echo adrotate_group(7);

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील तपेनिमगाव येथील गोदावरी पात्रातून सर्रासपणे जेसीबी ट्रॅक्टर, हायवाच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. या वाळू वाहतुकीच्या वाहनामुळे लगतच्या दत्तबाग वस्तीवरील नागरीकांना मोठा त्रास होत आहे. शुक्रवारी पहाटे वाळूने भरलेला हायवा दत्तबाग येथे पकडला. यावेळी वाळूमाफिया रामेश्वर चिंतामणी कांबळे (रा.चिंचवडगाव) याने ग्रामस्थांना ‘माझा टिप्पर पकडलेला तुम्हाला महागात पडेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात तुकाराम चोपडे, बालासाहेब शिंदे, परसराम शिंदे, शरद शिंदे, रमेश शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करत आहेत.echo adrotate_group(8);