आष्टी

लाचेची मागणी करणारा फौजदार एसीबीच्या जाळ्यात!

By Keshav Kadam

July 26, 2021

बीड : दि.26 : अटकपूर्व जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडअंती 80 हजार घेण्याचे मान्य केले. या प्रकरणी फौजदारावर औरंगाबाद एसीबीने सोमवारी (दि.26) कारवाई केली.

आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडुरंग लोखंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली. राहुल लोखंडे यांनी यातील तक्रारदार यांचेविरूध्द पोस्टे. अंभोरा येथे दाखल असलेल्या गुन्हयात त्यांना मंजूर असलेला अटकपूर्व जामीन मा. हायकोर्टाकडून रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 80 हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यांनतर औरंगाबाद एसीबीने ही कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.