corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आज कोरोनाचे द्विशतक

By Shubham Khade

July 27, 2021

बीड : जिल्ह्यात मंगळवारी (दि.२७) कोरोनाचे द्विशतक झाले आहे. निर्बंध कठोर करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने प्रशासन आणखी कडक पाऊले उचलण्याची शक्यता आहे.

सोमवारी ३४७६ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२७) प्राप्त झाले, त्यामध्ये २०० नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३२७६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३४, अंबाजोगाई ५, आष्टी ५५, धारूर ८, गेवराई १३, केज १५, माजलगाव ४, परळी १, पाटोदा २५, शिरूर २५, वडवणी १५ असे रुग्ण आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.