atyachar

क्राईम

गुंगीच्या गोळ्या देऊन महिलेवर अत्याचार!

By Keshav Kadam

July 27, 2021

परळी दि.27 : महिलेल्या गुंगीच्या गोळ्या बळजबरीने खाऊ घालून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.25) धर्मापूरी येथे घडली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, तालुक्यातील धर्मापुरी येथील 40 वर्षीय महिला आपल्या पतीच्या निधनानंतर 2 मुले व 1 मुलगी यांचा मजुरी करून सांभाळ करते. याच असहायतेचा फायदा घेत गल्लीतील अफसर शेख (वय 27) याने पीडित महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश करून मारहाण करीत गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 376, 452, 323 भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.