gold

क्राईम

सोन्याच्या बिस्कीटाच्या मोहापायी, महिलेने अंगावरील सोने काढून दिले!

By Keshav Kadam

July 27, 2021

परळी दि.27 : आठवडी बाजारातून घराकडे निघालेल्या एका महिलेला रस्त्यामध्ये दोन सोन्याचे बिस्कीट दिसले. त्यातील एक बिस्कीट महिलेने उचलले. पाठीमागून आलेल्या एका इसमाने ते बिस्कीट मागितले. बिस्कीटाच्या बदल्यात तुमचे दागिने द्या, असे म्हटल्यानंतर या महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने काढून दिले. सदरील हा प्रकार फसवेगिरीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत महिलेने तक्रार दाखल केली.

सुनिता नवनाथ गिते (वय 50, रा.वडसावीत्रीनगर) ही महिला बाजारातून घराकडे जात होती. रस्त्यात महिलेला दोन सानेयाचे बिस्कीट दिसून आले. त्यापैकी एक बिस्कीट तिने उचलून घेतले. याच वेळी तिच्या पाठीमागून एक इसम आला व त्याने दुसरे बिस्कीट उचलले. आयसीआयसीआय बँकेच्या रस्त्यावर असताना या इसमाने महिलेचा पाठलाग करत तिला गाठले व माझे सोन्याचे बिस्कीट परत द्या, असे म्हणू लागला. या महिलेला बोलत असताना सिगारेट ओढत त्याचा धूर या महिलेकडे सोडला. यामुळे आपल्याला भुरळ आली व अंगावरील 17 ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेतल्याची तक्रार या महिलेने दिली. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.