corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : कोरोनाचे पुन्हा द्विशतक

By Shubham Khade

August 01, 2021

बीड तालुक्यात कोरोनाचे अर्धशतक

बीड : जिल्ह्यात रविवारी (दि.१) पुन्हा कोरोनाचे द्विशतक झाले आहे. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली असून कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येते.

शनिवारी ५३६४ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.१) प्राप्त झाले, त्यामध्ये २०० नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ५१६४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ५२, अंबाजोगाई २, आष्टी ४८, धारूर ९, गेवराई ९, केज ९, माजलगाव ८, परळी १, पाटोदा २४, शिरूर ३०, वडवणी ८ असे रुग्ण आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.