corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आज १६७ कोरोनारुग्ण

By Shubham Khade

August 02, 2021

बीड : जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी (दि.२) १६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोना बळी व नव्या रुग्णांची साखळी तोडण्याचे बिकट आव्हान आरोग्य विभागासमोर कायम आहे.

रविवारी ३५७४ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२) प्राप्त झाले, त्यामध्ये १६७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३४०७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३७, अंबाजोगाई १, आष्टी ४३, धारूर ४, गेवराई १०, केज १८, माजलगाव १०, परळी १, पाटोदा २१, शिरूर १८, वडवणी ४ असे रुग्ण आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.