corona virus

बीड जिल्हा : आज 194 कोरोनारुग्ण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात गुरुवारी (दि.5) कोरोनाचे 194 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
जिल्ह्यातून शनिवारी 4712 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.5) प्राप्त झाले, त्यामध्ये 194 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4518 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई-4, आष्टी-54, बीड 43, धारूर-12, गेवराई 7, केज 15, माजलगाव 7, परळी-1, पाटोदा 36, शिरूर 4, वडवणी 11 असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, परळी तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.
तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी…

Tagged