corona virus

कोरोना अपडेट

आज बाधितांचा आकडा दोनशेपार!

By Keshav Kadam

August 06, 2021

बीड दि.5 : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.6) कोरोनाचे 212 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यातून शुक्रवारी 4822 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.6) प्राप्त झाले, त्यामध्ये 212 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4610 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई-5, आष्टी-52, बीड 49, धारूर-6, गेवराई 23, केज 6, माजलगाव 19, परळी-2, पाटोदा 18, शिरूर 19, वडवणी 23 असे रुग्ण आढळून आले.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी….