Site icon कार्यारंभ लाईव्ह

शाळा सुरु करण्याबाबतचे परिपत्रक जारी

school
echo adrotate_group(3);

मुंबई : राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचे परिपत्रक अखेर जारी करण्यात आले आहे. टास्क फोर्सच्या विरोधानंतरही शाळा सुरू करण्याची नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे हे विशेष. यात ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर शहरी भागातील 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करण्यास परवानगी आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे शहरातील शाळा सुरू करण्याबाबत महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यात आले आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी संबधित शहरात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. जिल्हाधिकार्‍यांनी शिक्षकांचे लसीकरणाचे नियोजन करावे. पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात वर्ग भरवावे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा. दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर ठेवावे. एक वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी बसवावे. कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थांना घरी पाठवून लगेच कोरोना चाचणी करून घेणे. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळेचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. शाळांचे वर्ग टप्प्याटप्प्याने भरवावेत. शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात करावी
शिक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळावा. शाळा सुरू करण्यासाठी पालिका आणि ग्रामीण स्तरावर समिती गठीत कराव्यात आदी नियम त्यासोबत जोडण्यात आले आहेत.echo adrotate_group(7); echo adrotate_group(1);echo adrotate_group(5);

Exit mobile version