अंबाजोगाई

तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेची आत्महत्या

By Keshav Kadam

August 11, 2021

echo adrotate_group(3);

अंबाजोगाई दि.11 : मोबाईलवर व घरी येऊन दिलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई शहरात घडली असून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धनराज सोपान घुले (रा.शिरपूर ता. केज) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विधवा मुलगी वडवणी येते वास्तव्यास होती. दोन महिन्यापूर्वी अंबाजोगाई शहरातील जैन गल्ली येथे मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवण्यासाठी किरायच्या घरात राहत होती. वडवणी येथील बाळू केंगार हा ओळखीचा फायदा घेत मुलीला फोनवर व प्रत्यक्ष घरी येऊन लगट साधण्याचा प्रयत्न करायचा. तसेच जाणीवपूर्वक त्रास द्यायचा. या त्रासाबाबत मुलीने सांगितले होते. त्यावरून केंगार यास मुलीला त्रास देऊ नको तिला सुखासमाधानाने जगू दे. म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला. तर बाळू केंगार याने तुम्ही माझ्या मध्ये पडू नका म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. दि.10 रोजी 10 वाजताच्या दरम्यान केंगार हा अंबाजोगाई येथील घरी आला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर चापटा बुक्क्यांनी मारहाण करू लागला. मारहाण केली. या त्रासाला कंटाळून मुलीने ओढणीने गळफास घेतला. या प्रकरणी बाळू केंगार विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात कलम 306, 323, 506 आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. आरोपी फरार असून तपास पीएसआय ज्ञानेश्वर गव्हाणे करत आहेत.echo adrotate_group(7); echo adrotate_group(1);echo adrotate_group(8);