corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आज ‛इतके’ कोरोना पॉझिटिव्ह

By Shubham Khade

August 14, 2021

बीड : जिल्ह्यात आज (दि.१४) कोरोना रुग्णसंख्या दिडशेच्या घरात आहे. प्रशासनाने लागू केलेले निर्बंध कागदावरच राहिल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे.

शुक्रवारी ७ हजार १ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.१४) प्राप्त झाले, त्यामध्ये १३९ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ६८६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात १८, अंबाजोगाई ३, आष्टी ५८, धारूर १४, गेवराई १२, केज ४, माजलगाव ८, परळी ६, पाटोदा १२, वडवणी ४ असे रुग्ण आढळून आले. तर शिरूर कासार तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.