कोरोना अपडेट

न.प.ला उर्दू भाषेतील फलक लावा; परळीमध्ये एमआयएमचे उपोषण

By Shubham Khade

August 14, 2021

मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरु : शेख शाफिक

परळी : येथील नगरपरिषदेच्या इमारतीस उर्दू भाषेतील फलक लावण्यात यावा, या मागणीसाठी एमआयएमचे परळी शहराध्यक्ष शेख शाफिक, शेख रोशन यांनी येथील नगरपरिषदेसमोर शनिवारी (दि.14) आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत फलक लावला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे शेख म्हणाले.

शेख यांच्या माहितीनुसार, जुन्या नगरपरिषदेच्या इमारतीवर उर्दू भाषेतून नावाचा फलक होता. नवीन इमारत बांधकाम काढल्यामुळे तो फलक काढण्यात आला होता. परंतू, नगरपरिषदेची नवीन इमारत होऊन अनेक वर्षे झाली वापरात आली असून त्यावर अद्याप उर्दू भाषेतील फलक लावण्यात आला नाही. वारंवार मागणी करूनही फलक लावण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने लढा देत आहोत, असे शेख म्हणाले.