बीड जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

६ तालुक्यांचा आकडा ५ च्या आत

बीड : जिल्ह्यात आज (दि.१७) कोरोना रुग्णसंख्या शंभरच्या जवळपास आहे. निर्बंधानंतर रुग्णसंख्या घटल्याचे चित्र आहे, त्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास आकडा वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

सोमवारी ४ हजार ६१७ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.१७) प्राप्त झाले, त्यामध्ये १०७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४ हजार ५१० नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २४, अंबाजोगाई ५, आष्टी २३, धारूर ५, गेवराई ३, केज १९, माजलगाव १, परळी १, पाटोदा १०, शिरूर ६ तर वडवणी तालुक्यात १० असे रुग्ण आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

Tagged