atyachar

क्राईम

पैशाचे आमिष दाखवून 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

By Keshav Kadam

August 18, 2021

नेकनूर दि.18: एका अकरा वर्षीय चिमुकलीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. सदरील घटना मंगळवारी (दि.17) बीड तालुक्यात घडली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम भगवान पवार (वय 24 रा.विद्यानगर, बीड) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला शेतात नेऊन अत्याचार केला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात कलम 376 (अ) (ब) भादवी सह कलम 3, 4 पोस्कोसह कलम 3 (2) (5) अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विजय लगारे हे करत आहेत.