corona

बीड जिल्ह्यात कोरोना शंभरच्या आत

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

परळी तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने

बीड : जिल्ह्यात आज (दि.२०) कोरोनाचा आकडा शंभरच्या आत आला आहे. तर, सलग तिसऱ्या दिवशी परळी तालुका शून्यावर आहे. त्यामुळे परळी कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे.

गुरुवारी ५ हजार ३३५ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२०) प्राप्त झाले, त्यामध्ये ९३ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ५ हजार २४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात १८, अंबाजोगाई ३, आष्टी ३४, धारूर ५, गेवराई ५, केज ६, माजलगाव २, पाटोदा १२, शिरूर ३ तर वडवणी तालुक्यात ५ असे रुग्ण आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

Tagged