बीड जिल्हा : आज ७८ कोरोनारुग्ण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दरदिवशी कमी -जास्त होताना दिसून येत आहे. आज (दि.२५) ७८ कोरोनारूग्ण आढळून आले आहेत. तर अंबाजोगाई, परळी तालुका शून्यावर असल्याने दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी ४ हजार ३१२ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२५) प्राप्त झाले, त्यामध्ये ७८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४ हजार २३४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात १२, आष्टी ३२, धारूर ६, गेवराई १, केज ४, माजलगाव २, पाटोदा ६, शिरूर ६ तर वडवणीतील ८ रुग्णांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

Tagged