corona-swab

बीड जिल्हा : आज १०५ कोरोनारुग्ण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दरदिवशी कमी -जास्त होताना दिसून येत आहे. आज (दि.२६) १०५ कोरोनारूग्ण आढळून आले आहेत.

बुधवारी ४ हजार ५६४ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२६) प्राप्त झाले, त्यामध्ये १०५ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४ हजार ४५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २५, अंबाजोगाई ७, आष्टी ३८, धारूर ४, गेवराई २, केज ९, परळी ३, पाटोदा ५, शिरूर १ तर वडवणीतील ११ रुग्णांचा समावेश आहे. तर माजलगाव तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

Tagged