corona

कोरोनाचे पुन्हा शतक

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

परळी तालुका शून्यावर

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचे आज (दि.२७) पुन्हा शतक झाले आहे. जिल्हावासियांसाठी ही चिंतेची बाब असून परळी तालुका शून्यावर आहे.

गुरुवारी ५ हजार १८४ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२७) प्राप्त झाले, त्यामध्ये १२१ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ५ हजार ०६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३७, अंबाजोगाई ३, आष्टी २९, धारूर ११, गेवराई १०, केज, १३ माजलगाव १, पाटोदा ९, शिरूर २ तर वडवणीतील ६ रुग्णांचा समावेश आहे. तर परळी तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

Tagged