बीड : खरिप व रब्बी सन 2020-21 हंगामाकरीता हंगामातील पिककर्जासाठी सर्व बँकांनी जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने निश्चित केलेल्या दरानुसारच पिककर्ज वाटप करावे अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.
सदरील पिक कर्ज हे प्रति हेक्टरी किमान असुन विशिष्ट पिकासाठी द्यावयाची प्रति हेक्टरी कमाल मर्यादा ज्या त्या जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने व संबधित बँकेंने निश्चित करावयाची आहे. बँकांच्या राज्यस्तरीय समितीने निश्चित केलेल्या पिक कर्ज दरात स्थानिक परिस्थिती विचारात घेवुन 10 टक्के पर्यंतचे वाढीव दर ठरविण्याबाबतचे अधिकार जिल्हास्तरीय तांत्रिक समितीला आहे. समितीने निश्चित केलेले पिककर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांनाही लागू आहेत असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.असे आहेत पिक निहाय कर्ज दरखरीप पिके (जिरायत) पिककर्ज दर (प्रति हेक्टरी)संकरीत ज्वारी 27,000सुधारीत ज्वारी 27,000मुग 21,000उडीद 21,000भुईमुग 35,000सुर्यफुल 25,000कापुस (सुधारीत) 57,000तुर 36,000सोयाबीन 27,000(बागायती पिके)मिरची 77,000आले (हळदी) 1,05,000द्राक्षे 3,20,000मोसंबी (संत्री) 85,000डाळींब 1,30,000पेरू 60,000सिताफळ 60,000