न्यूज ऑफ द डे

चार महिन्यांच्या अथक उपचारानंतर 45 वर्षीय रुग्णास मिळाले नवजीवन

By Shubham Khade

August 28, 2021

जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या टिमचे कौतूक

बीड : कोरोना संशयित रूग्ण म्हणून जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर चार महिन्यांच्या अथक उपचारानंतर 45 वर्षीय रुग्णास मिळाले नवजीवन मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या टिमचे कौतूक होत आहे.

श्रीहरी ढाकणे (वर्षे 45, रा. सारुळ ता. केज) असे त्या रूग्णाचे नाव आहे. ते 28 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित रुग्ण (कोमॉर्बीडीटी- लठ्ठपणा) म्हणून दाखल झाले असता रुग्णाचे ऑक्सिजनचे प्रमाण 33 टक्के इतके होते. रुग्णाचा एचआरसीटी स्कोर 25 होता. त्यामुळे त्यांना बायपॅप मशिनवर घेऊन 45 लिटर प्रति मिनीट इतका ऑक्सिजन पुरवठा चालू होता. इतर सर्व औषधोपचार केले. तब्बल 76 दिवस रुग्णास बायपॅप मशिनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. दरम्यानच्या काळात रुग्णाचे हिमोग्लोबीन कमी झाल्या कारणाने रक्तही देण्यात आले. या रूग्णाव उपचार करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिषक डॉ. संतोष धुत, डॉ. प्रशांत रेवडकर, डॉ. बाळासाहेब टाक, डॉ.स्वप्नील बडजाते यांनी अथक परिश्रम घेतले या कामी डॉ. रेश्मा मुरकुटे, डॉ. घुगे, डॉ. अमोल पवार, डॉ. चैतन्य डाके, डॉ. अश्विनी दळवी, डॉ. निकिता दराडे, डॉ. स्वीटी गायकवाड, डॉ. जयश्री बारटके, डॉ. नेहा गायकवाड, मेट्रन दिंडकर, इन्चार्ज सिस्टर पाडशीकर, शिला बनसोडे, शामल पवार व इतर सर्व स्टाफ व वार्ड बॉयूज यांनी सहकार्य केले. दरम्यान, 120 दिवसाच्या उपचारानंतर शुक्रवारी (दि.27) रोजी रुग्णास सुट्टी देण्यात आली. सुट्टी देताना रुग्णास ऑक्सिजनची गरज लक्षात घेता डॉ.रेश्मा मुरकुटे यांनी रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांना घरी ऑक्सिजन वापरासंबंधी प्रशिक्षीत केले आहे.

रुग्णास वेळोवेळी दिला ऑक्सिजनपुरवठा करणे कामी नावेद शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरील रुग्णाचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहणे व फिजीओथेरपी देऊन रुग्णाची फुफसाची क्षमता विकसित करणे कामी वेळोवेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सचिन आंधळकर, डॉ. महेश माने, डॉ. शाहिन शेख, डॉ. सुजाता व इतर सहकारी यांनी वेळोवेळी सहकार्य केले.

आजचा डिस्चार्ज आरोग्य यंत्रणेची क्षमता सिद्ध करणारा : डॉ.साबळेरुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांच्या मानसिकता व धैर्याचे कौतूक करावे लागले. जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी परिचारिका व वार्ड बॉय यांचे अभिनंदन. तब्बल चार महिने रुग्ण मृत्यूशी लढत होता आणि आमचे तज्ञ कर्मचारी परिवारीका त्याच्या संघर्षाला आवश्यक ते साथ देत होते, आज होणारा डिस्चार्ज समाधान व प्रेरणा देणारा आहे. सामान्य लोकांना दिलासा देणारा आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेतील ओळख व क्षमता सिध्द करणारा सदरील रुग्णाचा डिस्चार्ज आहे.