CORONA

कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात आज (दि.२८) कोरोनारुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. हा आकडा दरदिवशी कमी -अधिक होत आहे. कोरोनारुग्ण ८२ तर कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा १०३ आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

शुक्रवारी ४ हजार ४२० जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२८) प्राप्त झाले, त्यामध्ये ८२ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४ हजार ३३८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात १७, अंबाजोगाई २, आष्टी २३, धारूर १, गेवराई ७, केज १२, माजलगाव २, परळी १, पाटोदा ६, शिरूर १ तर वडवणीतील १० रुग्णांचा समावेश आहे.

Tagged