न्यूज ऑफ द डे

पीक विमा पाहिजे असेल, तर…

By Shubham Khade

September 01, 2021

echo adrotate_group(3);

कृषी विभागाने केले महत्वाचे आवाहन

बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे अनेकठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतजमीनच वाहून गेल्याचे प्रकार देखील घडले आहेत. पिकांच्या नुकसानीचे फोटो व माहिती पच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या पवर पाठवायची आहे. तसेच ऑफलाईन तक्रार देखील करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया 72 तासात करणे अपेक्षित असल्याने शेतकर्‍यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.echo adrotate_group(7);

जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे देखील नुकसान अनेक भागात झाले आहे. पीक विमा उतरवलेल्या शेतकर्‍यांना या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी ऑनलाईन फोटोसह नुकसानीची तक्रार पच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. तसेच ही तक्रार ऑफलाईन देखील करता येणार आहे. याचा कालावधी हा 72 तास असणार आहे, तर, यासंदर्भातील पीक विमा कंपनीकडून फार्मर प ‘गुगल प्ले’वरून डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन केले आहे. मागीलवर्षी शेतकर्‍यांनी पच्या माध्यमातून तक्रारी केल्या नसल्यामुळे नुकसान होऊन देखील विमा रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळे शासनाच्या पंचनाम्यावर अवलंबून राहू नका, असे आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.echo adrotate_group(5);

शासनाचा पंचनामा गृहित धरून लाभ द्यावाकृषी विभाग व विमा कंपनीकडून ऑनलाईन तक्रार करण्याची युक्ती जुलमी आहे. अनेकांकडे मोबाईल नाहीत. असला तर जास्त समजत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जे नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत, त्यावरून पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. कंपनी काय शेतकर्‍यांना भीक देत नाही. आम्ही आधी पैसे भरतो, मग नुकसान झाल्यावर भरपाई मागतो. प्रशासनाचे पंचनामे गृहित धरून नुकसान भरपाई दिली नाही, तर, पीक विमा कंपनीविरुद्ध न्यायालयात दाद मागू, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी दिली.echo adrotate_group(9);

ऑनलाईन तक्रार करता येणारशेतकर्‍यांनी क्रॉप इन्शुरन्स अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार करावी किंवा टोल फ्री क्र- 1800-419-5004 तसेच लिखित स्वरूपात बँकेत व तालुका कृषी अधिकार्‍याकडे नुकसान झाल्याची तक्रार करता येणार आहे. त्यानुसार विम्याचा लाभ मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केले आहे. echo adrotate_group(10);