क्राईम

करुणा मुंडे पोलीस ठाण्यात!

By Keshav Kadam

September 05, 2021

बीड दि.5 : करुणा मुंडे या रविवारी (दि.5) दुपारी परळीत दाखल झाल्यानंतर त्यांनी वैजीनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुंडे वैजीनाथ मंदिर परिसरामध्येच पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र काही महिला व कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे त्यांची पत्रकार परिषद होऊ शकली नाही. करुणा मुंडे यांच्याविरोधात काही महिला परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून करुणा मुंडे यांनाही पोलीस ठाण्यात आणले आहे. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगाही उपस्थित आहे. यामुळे परळी शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गर्दीमुळे पोलीस प्रशसनही हातबल झाले आहे. पुढे पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.