क्राईम

पिस्टल आढळल्याने खळबळ; हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी

By Keshav Kadam

September 05, 2021

परळी दि.5 : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

करुणा शर्मापासून माझ्या जीवितालाधोका-मुंडेंनी याआधीच केले होते स्पष्टनेहमी धनंजय मुंडेंना उध्वस्त करणार, संपावणार यासारख्या भाषा करणार्‍या करुणा शर्मा यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात तसेच फेसबुक वरील आपल्या खुलाशात देखील म्हटले होते. वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार, पत्रकार परिषद घेणार व त्यानंतर मुंडेंच्या घरी जाणार असे स्वतः करुणा यांनीच जाहीर केले होते. तेव्हा बेकायदेशीर रित्या बाळगलेले पिस्तुल घेऊन करुणा शर्मा मुंडेंच्या घरी कोणत्या उद्देशाने निघाल्या होत्या, या सवालाने परळीत एकच खळबळ उडाली आहे. परंतु करुणा शर्मा नामक या महिला परळीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या व्यथा मांडायला व न्याय मागायला आल्या नव्हत्या हे मात्र आता स्वयंस्पष्ट आहे!