बीड एसीबीला भारत राऊत यांची नियुक्ती

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.6 : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून भारत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.
येथील स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस निरीक्षक भारत राऊत यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे बदली झाली होती. बीड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी बीड येथे भारत राऊत यांची पदोन्नतीवर पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे सोमवारी (दि.6) आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजीव भोळे यांनी काढले आहेत.

Tagged