७ हजार रुपये डिस्काउंटसह मिळत आहे OnePlus ९ ५G स्मार्टफोन, असा घ्या ऑफरचा लाभ

बीड

नवी दिल्ली :OnePlus 9 5G स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर ७ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जात आहे. हे डिस्काउंट फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजवर दिले जात आहे. वनप्लस ९ प्रो ५जी वर देखील ५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल
OnePlus 9 5G ला डिस्काउंटनंतर केवळ ४७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ही किंमत १२ जीबी रॅम व्हेरिएंटची आहे. अ‍ॅमेझॉनवर फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. यासाठी ई-कॉमर्स साइटवर एक कूपन देखील उपलब्ध करण्यात आले आहे. या कूपनचा लाभ सर्व ग्राहकांना घेता येईल. या कूपनला चेकआउटच्या आधी अॅप्लाय केल्यास वनप्लस ९ ५जी ची किंमत कमी होईल. कूपनची किंमत ४ हजार रुपये आहे
याशिवाय तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट अथवा क्रेडिट कार्ड असल्यास ईएमआय ट्रांझॅक्शनवर ३ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच, एकूण ७ हजार रुपये डिस्काउंटसह वनप्लस ९ ५जी च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला खरेदी करू शकता.

OnePlus 9 Pro 5G स्मार्टफोन देखील डिस्काउंट मिळत आहे. कूपनद्वारे फोनवर २ हजार रुपये सूट मिळेल. तर एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे ३ हजार रुपये अतिरिक्त सूट मिळेल.
हे डिस्काउंट ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. तुम्ही जर OnePlus 9 5G आणि OnePlus 9 Pro 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे.