क्राईम

‘त्या’ बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला

By Keshav Kadam

September 08, 2021

बीड दि.8 तालुक्यातील कपिलधार येथे धबधबा पाहण्यासाठी गेलेले दोन मुले पुरात वाहून गेली होती. यातील एका मुलाला वाचण्यात यश आले होते तर दुसरा मुलगा हा बेपत्ता होता. बुधवारी सकाळी बेपत्ता मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड शहरातील यशराज राहुल कुडके व ओमकार सचिन विभुते हे दोघे कपिलधार येथे मंगळवारी दुपारी धबधबा पाहण्यासाठी गेले होते. सिमेंट रोडवरच्या पुलावरून दुचाकीसह दोघे वाहून गेले होते. यातील ओंकार विभुते यास वाचवण्यात पोलिसांना यश आले होते तर यशराज कुडके हा बेपत्ता होता. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह परिसरातील शिंदे यांच्या शेतात आढळून आला. घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल असून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.