केज

सर्पदंशाने दोन चिमुकल्या दगावल्या; आईची मृत्यूशी झुंज

By Keshav Kadam

September 08, 2021

echo adrotate_group(3);

केज दि.8 : दोन मुलींसह आईला सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी (दि.7) मध्यरात्री केज तालुक्यातील सानेसांगवी नं.2 येथे घडली. या घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाला असून आईची स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्वा (4) व सुप्रिया दीपक साखरे (3) असे मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर आई सोनाली दीपक साखरे (28) यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक साखरे हे पत्नी आणि चार मुलीसह सोनेसांगवी नं.2 येथे पत्र्याच्या शेडच्या घरात राहतात. मंगळवारी मध्यरात्री सोनाली दीपक साखरे आणि दोन चिमुकल्या मुली दुर्वा व सुप्रिया या तिघींना सर्पदंश झाला. साप नंतर दीपक साखरे यांच्या अंगावर गेला. सापाच्या स्पर्शाने दीपक यांना जाग आली. त्यांनी उठून पाहिले असता विषारी साप दिसला. त्यांनी लागलीच सापाला मारले. त्यानंतर पत्नी आणि मुलींना सर्पदंश झाल्याचे दीपक यांच्या लक्षात आले. स्वप्नाली आणि स्वीटी या गतप्राण झाल्या तर जयश्री मृत्यूशी झुंज देत होत्या. दीपक यांनी लागलीच पत्नीला अंबाजोगाई येथील स्वामी रामाननंद तिर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.echo adrotate_group(6); echo adrotate_group(10);echo adrotate_group(8);