अंबाजोगाई

एएसपी स्वाती भोर यांची बदली

By Keshav Kadam

September 09, 2021

बीड दि.9 : येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती रामराव भोर यांची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर अंबाजोगाई अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कविता नेरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अभिजित तानाजी धाराशिवकर (फस्के) यांची निुयक्ती करण्यात आली आहे. तर विजय लगारे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत, रायगड येथे नियुक्ती करण्यात आली. हे आदेश गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड गुरुवारी (दि.9) यांनी काढले.