अंबाजोगाई

करुणा शर्मांच्या न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

By Keshav Kadam

September 20, 2021

echo adrotate_group(3);

अंबाजोगाई दि.20 : जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम अजून एक दिवस वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय अंबाजोगाई न्यायालयाने मंगळवार (दि.21) पर्यंत राखून ठेवला आहे. आज सोमवारी (दि.20) रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यालायासमोर झाला. यामुळे त्यावर निर्णय येणे अपेक्षित होते. मात्र न्यायालय मंगळवारी जमीन अर्जावर निकाल देणार असल्याचे शर्मा यांचे वकील जयंत भारजकर यांनी सांगितले. परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा शर्मा या 6 सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अशोक कुलकर्णी तर करुणा शर्मा यांच्या वतीने अ‍ॅड. भारजकर यांनी बाजू मांडली. करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचा कृत्य करू नये अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवली होती तर करुणा शर्मा यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. भारजकर यांनी केला अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावर मंगळवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम एक दिवसाने वाढला आहे.echo adrotate_group(7); echo adrotate_group(10);echo adrotate_group(8);