districk hospital

नर्सिंगच्या विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या कर्मचार्‍यावर गुन्हा

क्राईम बीड

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या विद्यार्थिनीची रुग्णालयातीलच एका कर्मचार्‍याने छेड काढली होती. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात जावून त्याला चोप दिला होता. आता याच प्रकरणात पीडितेने पेठबीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्रीसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर डॉ.थोरात यांनी त्याची बदली माजलगाव ग्रामीण रुग्णालयात केली आहे.  शेख मेहमुद शेख महंमद पाशा (वय 47) असे कर्मचार्‍याचे नाव आहे. बीड जिल्हा रुग्णालयातही शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनी कर्तव्य बजावतात. 4 जून रोजी सकाळी 11 वाजता पीडित विद्यार्थिनी कार्यालयीन कामकाजासाठी गेली होती. याचवेळी येथील कर्मचारी शेख मेहमुद शेख महंमद पाशा (वय 47) याने तिची छेड काढली. त्यानंतर या विद्यार्थिनीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे तक्रार केली होती. यात त्रीसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर डॉ.थोरात यांनी त्याची बदली माजलगाव ग्रामीण रुग्णालयात केली आहे. तर पुढील कारवाईसाठी अहवाल उपसंचालकांकडे पाठविला आहे. दरम्यान, चौकशी पूर्ण होताच पीडितेने पेठ बीड पोलीस ठाणे गाठून शेख विरोधात तक्रार दिली. त्यावरून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला जामिन मंजूर झाल्याचे तपास अधिकारी सपोनि.भारती यांनी सांगितले. दरम्यान रुग्णालयात येऊन पत्नीची छेड काढणार्‍या कर्मचार्‍याला मारहाण झाली होती. त्यानंतर या कर्मचार्‍याने तिच्या पतीविरोधात शासकीय कामात अडथळा व मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. त्यालाही अटक केल्याचे पोनि.विश्वास पाटील यांनी सांगितले.

Tagged