ACB TRAP

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात !

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


आष्टी दि.6 : सातबारावर वारसाची नोंद करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील तलाठ्यास बीड एसीबीने बुधवारी (दि.6) रंगेहाथ पकडले. एसीबीचा पदभार घेतल्यानंतर उपअधीक्षक भारत राऊत यांच्या नेतृत्वात ही पहिलीच कारवाई झाली असून राऊत यांनी कारवाईचे खाते उघडले आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील सजाचा तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे (वय 49) हा सातबारावर पत्नी व नातेवाईकांचे वारस नोंद करण्यासाठी 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीच्या बीड कार्यालयाकडे केली होती. त्याच वेळी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणीही केली गेली होती. दरम्यान, यानंतर बुधवारी एसीबीने आष्टी तहसिल कार्यालयाच्या परिसरात सापळा लावला होता. तहसिल परिसरात तलाठी नरसाळे याने लाच स्विकारताच एसीबीच्या पथकाने त्याला गजाआड केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोलिस निरीक्षक सुनिता मिसाळ, कर्मचारी श्रीराम गिराम, भरत गारदे, हनुमान गोरे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tagged