‘त्या’ घटनेत आत्याचा मुलगाच निघाला खूनी!

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.7 : राष्ट्रीय महामार्गालगत असणार्‍या रांजणीजवळ मागील आठवड्यात एक मानवी सांगडा आढळून आला होता. गेवराई पोलिसांनी डॉक्टरांच्या मदतीने तो सांगडा महिलेचा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या वस्तूंवर त्या महिलेची ओळख देखील पटवली होती. पोलीस तपासामध्ये ‘त्या’ महिलेचा तिचा आत्याच्या मुलानेच पैशासाठी खून केल्याचे समोर आले आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गेवराई पोलीसांनी हा गुन्हा जालना पोलीसांकडे वर्ग केला आहे.
राधाबाई माणिकराव गायकवाड (वय-34) यांचा मृतदेह रविवारी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रांजणीजवळ आढळून आल्यानंतर गेवराई पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त करत त्यादृष्टीने तपास सुरू केला होता. अखेर याप्रकरणात राधाबाईचा खून तिच्या आत्याच्या मुलानेच केल्याचे समोर आले. सुभाष बापुराव शेरे असे त्या मुलाचे नाव असून राधाबाई यांचे सुभाषकडे हातउसने अडीच लाख रुपये होते. राधाबाई हे पैसे वारंवार सुभाषला मागत होत्या. मात्र तो तारखा देत असे. शेवटी राधाबाई यांनी सुभाषकडे पैसे असल्याची माहिती आपल्या भावाला दिली. मात्र त्यानंतर ही पैशांचा तगादा लावल्यानंतर ही सुभाष पैसे देत नव्हता. 15 दिवसापूर्वी राधाबाई आपल्या बहिणीच्या घरी गेल्या होत्या. दुसरी दिवशी त्या आपल्या गावी येत असताना रस्त्यात सुभाषने त्यांना अडवून गाडीवर बसवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणात आणखी खोलात गेल्यानंतर अडीच लाखांमुळे राधाबाईची हत्या करण्यात आली. प्रकाश दुनगहू यांच्या फिर्यादीवरुन सुभाष शेरेवर खूनाचा गुन्हा दाखल झाला असून सदरील गुन्हा जालना पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान सुभाष शेरे अद्याप फरार असून पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Tagged