क्राईम

ठाणेप्रमुखांच्या बदल्या!

By Keshav Kadam

October 27, 2021

बीड दि.27 ः बीड जिल्हा पोलीस दलातील ठाणेप्रमुखांची बुधवारी (दि.27) खांदेपालट करण्यात आली. यामुळे काहींना दुखःद तर काहीन सुखद धक्का बसला आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी परळी शहरचे पोनि.हेमंत कदम, माजलगाव ग्रामीणचे पोनि.संतोष पाटील, पेठबीड ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील यांची नियंत्रणक कक्षात तर नियंत्रण कक्षातील पोनि.उमाशंकर कस्तुरे यांची परळी शहर ठाणे, पोनि.प्रकाश मुंडे यांची माजलगाव ग्रामीण व धारुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार पालवे यांची पेठ बीड ठाणे (प्रभारी म्हणून) नियुक्तीचे आदेश बुधवारी दिले आहे. दरम्यान नियंत्रण कक्षात आलेल्या निरीक्षकांनाही चांगले ठाणे मिळणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.