फडातून ऊस घेवून जाणार्‍या ट्रॅक्टरने मजुराची मुलगी चिरडली!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड वडवणी

बीड दि.30 : ऊसाचा ट्रॅक्टर भरल्यानंतर फडातून बाहेर काढताना ट्रॅक्टरखाली चिरडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. सदरील मजुर हे वडवणी तालुक्यातील आहेत. या मजुरांवर कारखानदारांकडून या पीडित कुटूबीयांनाच दडपशाही केली जात आहे.
दसरा झाल्यानंतर बीड जिल्ह्यातून ऊसतोड मजूर राज्यातील विविध जिल्ह्यांसाह परप्रांतात ऊसतोडणीसाठी जातात. आतापार्यंत तब्बल चार लाखांच्या घरात ऊसतोड मजुरांनी स्थलांतर केले आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील किशोर कारके यांच्यासह कुटुंब कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हेमरस कारखान्यावर ऊसतोडणी गेले होते. शेतातील ऊस तोडणी झाल्यावर ट्रॅक्टर भरला. पाठीमागेच दीदी कारके ही चार वर्षाची मुलगी फडातच होती. ट्रॅक्टर मागे घेत असताना ती चिरडली गेली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

आठ दिवसात वसतीगृह सुरु करा-अजिंक्य चांदणे
उसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन उपयशी ठरत आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांची ऊसतोड मजुरांच्या पाल्याप्रती तळमळ आहे, मात्र प्रशासकिय यंत्रणा कुजकामी ठरत आहे. वेळ काढू पणा करत आहे. त्यामुळे अनेक मजुरांनी पाल्यांना सोबत नेले आहे. सर्व्हे करुन कारखाना व मुकादमांवर दंडात्मक कारवाई करावी व मुलांना परत शाळेच्या प्रवाहात आणावे, आठ दिवसात जिल्ह्यातील वसतीगृह सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करावी, अन्यथा जिल्ह्यातील एकही कारखाना सुरु ठेवू देणार नाही. असे अजिंक्य चांदणे यांनी म्हटले आहे.

Tagged