ajit pawar

न्यूज ऑफ द डे

उपमुख्यमंत्र्यांच्या मालमत्तांवर आयकरची कारवाई; कोट्यवधींची मालमत्ता ‘अटॅच’

By Shubham Khade

November 02, 2021

महाविकास आघाडीला मोठा धक्का

मुंबई : १३ तासांच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आयकर विभागाच्या रडावर आहेत. त्यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता अटॅच करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा दुसरा धक्का बसला आहे.

आयकर विभागाच्या बेनामी प्रॉपर्टी सेलच्यावतीनं अजित पवारांच्या 1000 कोटींहून अधिक रकमेची संपत्ती अटॅच करण्यात आली आहे. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्याची 600 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आयकर विभागाकडून दक्षिण दिल्लीमधील जवळपास 20 कोटींचा फ्लॅटही अटॅच करण्यात आला आहे. यासोबत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं मुंबई स्थित कार्यालय निर्मल हाऊस, याची किंमत आहे जवळपास 25 कोटी रुपये तेदेखील अटॅच करण्यात आलं आहे. याशिवाय गोव्यातील रिसॉर्ट ज्याची किंमत आहे 250 कोटी रुपये हेदेखील अटॅच करण्यात आलं आहे. यासोबतच महाराष्ट्रातील 27 वेगवेगळ्या जमिनी ज्यांची किंमत जवळपास 500 कोटी सांगण्यात येत आहे, तीदेखील अटॅच करण्यात आली आहे. दरम्यान, आयकर विभागानं अजित पवारांची हजारो कोटींची मालमत्ता अटॅच केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाकडून 90 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या कालावधीत अजित पवारांना अटॅच करण्यात आलेली संपूर्ण संपत्ती गैरमार्गानं कमावलेली नसल्याचं सिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना योग्य कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.