बीड

पाटोदा नगरपंचायतचेही आरक्षण जाहीर

By Shubham Khade

November 15, 2021

वार्डनिहाय आरक्षण जाणून घ्या

पाटोदा : येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. पूर्वीच्या आरक्षणात थोडेफार बदल झाल्याने काहींची निराशा तर काहींना आनंद अशी अवस्था झाली आहे. आजच्या आरक्षणात ओबीसी आरक्षणही एका जागी कमी झाल्याने ओबीसींना एका जागेचा फटका बसला आहे. या आरक्षणात महिलांसाठी नऊ जागा राखीव झाल्या आहेत. त्यामुळे या वार्डात महिला आरक्षण पडल्याने विद्यमान नगरसेवकांना आपल्या पत्नींना पुढे करण्याची वेळ आली आहे.

पाटोदा तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत चिट्ठीद्वारे नव्याने काढण्यात आली. पहिल्या आरक्षणात थोडे बदल झाले आहेत. प्रभाग क्रमांक ७ पहिल्या आरक्षणात नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव होता. यावेळी सर्व साधारण महिलासाठी राखीव झाला आहे. तर प्रभाग क्रमांक ४ सर्व साधारण महिलासाठी राखीव होता. आता नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे. प्रभाग क्रमांक १७ पहिल्या वेळेस सर्व साधारण साठी होते. आजच्या आरक्षणात सर्व साधारण महिलांसाठी राखीव पडला आहे.

पाटोदा नगर पंचायतचे आरक्षणवार्डनिहाय पुढीलप्रमाणे :अनुसूचित जाती १, ना.मा.प्रवर्ग २, ९, सर्व साधारण ३, १०, ८, १३, १४, ना.मा.प्रवर्ग ४, अ. जा. महिला ५, ना.मा. प्रवर्ग महिला ६, सर्वसाधारण महिला ७, ११, १२, १५, १६, १७