बीड

आष्टी नगरपंचायतचे आरक्षण जाहीर

By Shubham Khade

November 15, 2021

आष्टी : नगरपंचायात आरक्षण प्रभाग सोडत येथील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे, मुख्याधिकारी निता अंधारे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत आज पार पडली आहे. आता कोणत्या वॉर्डातून कोण नगरसेवक पदासाठी उमेदवार उभा करायचा याबाबत विधान परिषदेचे आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे, आष्टी मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.साहेबराव दरेकर हे नेते आता चाचपणी करण्यास सुरुवात करतील.

अशी आहे आरक्षण सोडतएससी महिला १, सर्वसाधारण खुला २, ८, १३, १४, ओबीसी खुला ३, ६, १०, ओबीसी महिला ४, ११, सर्वसाधारण महिला ५, ७, ९, १२, १५, १६, १७