न्यूज ऑफ द डे

मद्यपींसाठी खुशखबर; दारू होणार स्वस्त

By Shubham Khade

November 20, 2021

echo adrotate_group(3);

राज्य सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात

मुंबई : एकीकडे इंधनासह गॅसचे भाव शंभरीपार गेले असतानाच राज्य सरकारनं इम्पोर्टेड म्हणजेच देशाबाहेरुन आयात केल्या जाणार्‍या स्कॉच आणि व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात तब्बल 50 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता राज्यातील इम्पोर्टेड मद्याचे दर इतर राज्यांच्या तुलनेत समान होणार आहेत.echo adrotate_group(7);

पीटीआयच्या वृत्तानुसार, स्कॉच आणि व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कातील मिळकत आता 300 टक्क्यांवरुन 150 टक्क्यांवर आणली आहे. गुरुवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इम्पोर्टेड स्कॉच आणि व्हिस्कीमधून राज्य सरकारच्या तिजोरीत जवळपास दरवर्षी 100 कोटी रुपयांची मिळकत होते. पण आता शुल्क कपातीनंतर मागणी वाढून 250 कोटी रुपयांची मिळकत राज्याला होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण, इम्पोर्टेड मद्याच्या विक्रीत 1 लाख बाटल्याहून 2.5 लाख बाटल्या इतकी होईल, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांना मद्यावरील कराच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पन्न मिळतं.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);