कोरोना अपडेट

प्रशासनाचा अतिरेक; रस्त्यावर वाटमारी केल्यासारखं टोचलं जातंय इंजेक्शन

By Balaji Margude

November 21, 2021

लसीकरणच करायचे असेल तर सगळ्या सरकारी कार्यालयाबाहेर तंबू ठोका

बालाजी मारगुडे । बीड

दि. 21 : अजुनही 25 टक्के सरकारी कर्मचार्‍यांनी स्वतःला लस टोचून घेतली नाही. अजुनही अर्ध्याहून अधिक व्यापार्‍यांनी, तिथे काम करणार्‍यांनी लस घेतलेली नाही. अजुनही अर्ध्याहून अधिक कोचिंग क्लासेसला जाणार्‍या, स्पर्धा परिक्षेचे क्लास करणार्‍या, कोर्टात टेबल मांडून बसलेल्या वकीलांनी लस टोचून घेतलेली नाही. असे असताना आरोग्य प्रशासन रस्त्यावर वाटमारी केल्यासारखी लसीकरणाची सक्ती करीत आहे. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारीच वाढवायची असेल तर सगळ्या सरकारी कार्यालयाबाहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर, उपोषणाला बसण्याच्ी ठिकाणी, न्यायालयाच्या गेटवर आरोग्य प्रशासनाने तंबू ठोकावेत, वाहनात पेट्रोल-डिझेल भरायला आलेल्या वाहनधारकांचे सर्टीफिकेट तपासून तिथे इंजेक्शन टोचावे. परंतु लसीकरण करूनही दररोज त्याच त्याच व्यक्तीचं सर्टीफिकेट महामार्गावर तपासण्याचा वेळ खाऊ अतिरेकीपणा आरोग्य प्रशासनाने थांबवावा, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.

वाहनांच्या आशा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यात ऊसाच्या ट्रॅक्टर आणि ट्रकही अडकून पडले आहेत. एखादा अपघात घडला तर आरोग्य प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी कालपासून माजलगावात परभणी चौकात वाहने अडवून येणार्‍या जाणार्‍यांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याचा धडाका लावला आहे. परिणामी या चौकात वाहनांच्या दोन दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यात ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर, आडतवर माल घेऊन जाणारे शेतकर्‍यांचे वाहने विनाकारण खोळंबली आहेत. मागील दोन दिवसांपासून पोलीस आणि आरोग्य प्रशासनाकडून हा प्रकार सुरु आहे. हा अधिकाराचा गैरवापर असून प्रशासनाला न्यायालयात खेचण्यात येईल, असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिला आहे.

वाहनांच्या आशा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यात ऊसाच्या ट्रॅक्टर आणि ट्रकही अडकून पडले आहेत. एखादा अपघात घडला तर आरोग्य प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा.

लसीकरण व्हावं पण अतिरेक नकोजिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून लसीकरण करून घ्यावे. परंतु जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर टोल वसुली केल्याप्रमाणे वाहने अडवून वाहनधारकांना वेठीस धरू नये. ज्यांनी लसीकरण केले त्यांचा वेळ खाण्याचा अधिकार आरोग्य प्रशासनाला कोणी दिला?

जिल्हा रुग्णालयाबाहेर सक्ती कराजिल्हा रुग्णालयात रुग्णांबरोबरा येणार्‍या नातेवाईकांचे लसीकरण करण्याची खास गरज आहे. डॉ.साबळे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर लसीकरणाचा तंबू ठोकून नागरिकांचे लसीकरण करावे. परंतु हिरोगिरी करण्याच्या नादात वाहने अडवून लोकांना मनस्ताप देऊ नका, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.

जिल्हाधिकारी, एसपी, सीईओंनी किती जणांना टोकले?जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी यांच्याकडे येणार्‍या नागरिकांचा मोठा ओघ असतो. आपल्याकडे येणार्‍या किती नागरिकांना या अधिकार्‍यांनी लसीकरण केला का म्हणून टोकले आहे? नसेल तर मग आधी आपल्या कार्यालय परिसरापासून याची सुरुवात करावी.

इंडीयन बार कौन्सिलची हीच ती तक्रार

राज्यापालांकडे तक्रारजिल्हा प्रशासनाकडून सुरु असलेल्या अतिरेकाबद्दल डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. हा अतिरेकी प्रकार लवकरात लवकर न थांबविल्यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओ आणि जिल्हा शल्य चिकित्सक या सगळ्यांना हायकोर्टात खेचण्यात येईल. लसीकरण हे ऐच्छिक आहे त्याची कुठल्याही नागरिकांवर सक्ती करता येणार नाही. आरोग्य प्रशासनाकडून जो प्रकार सुरु आहे तो त्यांना महागात पडणार असल्याचे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे. सक्तीच्या लसीकरणाबाबत इंडीयन बार असोसिएशनने देखील फौजदारी कारवाई करण्यास असे अधिकारी पात्र असतील असे म्हटले आहे.

डॉ.गणेश ढवळे यांनी राज्यपालांकडे केलेली तक्रार

लग्न आणि वर्‍हाडींचा खोळंबाआज मोठ्या प्रमाणावर लग्नतिथी असल्याने आणि त्यात आरोग्य प्रशासनाने रस्त्यावर असला घायटा घालून ठेवल्याने अनेक वर्‍हाडी वाहने यात अडकून पडलेली आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणावर आभाळ आल्याने लग्न उरकून घेण्याची घाई वधू पक्षाला आहे. आरोग्य प्रशासनाने रस्त्यावर मांडलेला हा खेळ त्वरीत बंद करावा, अशी मागणी होत आहे.

हीच हिंमत परळीत किंवा बीडमध्ये दखवता का?आरोग्य प्रशासनाने दमदाटी करून माजलगावात सक्तीचं लसीकरण सुरु केलं आहे. हीच हिंमत परळी किंवा बीडमध्ये दाखवता येईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.