केज

विष प्राशन करून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By Shubham Khade

November 21, 2021

केज : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील होळ येथे शुक्रवारी (दि.१९) घडली.

डिगांबर माणिक गोपाळघरे (वय २५) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे १ एकर कोरडवाहू शेती आहे. वडिलांकडे बँकेसह खाजगी कर्ज होते. त्यामुळे ते चिंताग्रस्त असत. आर्थिक विवंचनेतून त्यांनी विष प्राशन केले. त्यानंतर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलीस चौकीत नोंद झाली आहे. मृतदेहावर शनिवारी होळ येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व मुलगी असा परीवार आहे.