सैफ-करीनाचा तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका; पोलिसांनी रोखलं आणि म्हणाले..

मनोरंजन महाराष्ट्र

करोना व्हायरसच्या भीतीने गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे घरीच असलेल्या सैफ अली खान व करीना कपूरने रविवारी मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारला. मात्र फार थोडाच वेळ त्यांना समुद्रकिनाऱ्याची सफर करता आली. कारण लहान मुलांना बाहेर फिरण्यास परवानगी नाही असं एकाने म्हणताच सैफ-करीना तैमुरला घेऊन घरी परतले. तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फिरतानाचे सैफ-करीनाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तैमुरला खांद्यावर उचलून सैफ समुद्रकिनारी चालत होता तर करीना मोकळ्या हवेत फेरफटका मारत होती. थोड्याच वेळात तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी सैफ-करीनाला सांगितले, “लहान मुलांना बाहेर घेऊन येण्यास परवानगी नाही.” हे ऐकताच सैफ व करीना घरी माघारी परतले.

Tagged