न्यूज ऑफ द डे

बीड जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी ‘या’ 5 पिकांना विमा संरक्षण

By Shubham Khade

November 23, 2021

echo adrotate_group(3);

शेतकर्‍यांनी तत्काळ विमा भरावा : जिल्हाधिकारी

बीड : जिल्ह्यासाठी सन 2021-22 खरीप व रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली असून, योजनेकरीता पुढील तीन वर्षासाठी 2020-21 ते 2022-23 खरीप व रब्बी हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी काम करणार आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी 5 पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे.echo adrotate_group(7);

ज्वारी बा., ज्चारी जि., गहू, हरभरा व रब्बी कांदा या पिकांचा समावेश आहे. पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम हेक्टरी निश्चित करून देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिनार्‍या शेतकर्‍यांनी अधिक महितीसाठी विमा कंपनीचे तालुका स्तरावरील प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, क्षेत्रीय कर्मचारी व सेतु सविधा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. दरम्यान, शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशीही 24 तास सुरु राहतील. त्यामुळे शेतकर्‍यांने लवकर विमा भरण्याची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी. विमा हप्ता भरण्यासाठी शेतकर्‍यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता विमा भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी म्हटले आहे.echo adrotate_group(8);

ही आहेत पिकेज्वारी बा.- विमा संरक्षित रक्कम (रू. प्रति.हे.) 30.000/- शेतकरी विमा हप्ता रक्कम ( रू.प्रति हे.) 450/- , ज्चारी जि.- विमा संरक्षित रक्कम (रू. प्रति.हे.) 28.000/- शेतकरी विमा हप्ता रक्कम ( रू.प्रति हे.) 420/-, गहू – विमा संरक्षित रक्कम (रू. प्रति.हे.) 38.000/- शेतकरी विमा हप्ता रक्कम ( रू.प्रति हे.) 570/-, हरभरा – विमा संरक्षित रक्कम (रू. प्रति.हे.) 35.000/- शेतकरी विमा हप्ता रक्कम ( रू.प्रति हे.) 525/-, रब्बी कांदा – विमा संरक्षित रक्कम (रू. प्रति.हे.) 80.000/- शेतकरी विमा हप्ता रक्कम ( रू.प्रति हे.) 4000/-.echo adrotate_group(9);

पिक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड, बँक पासबुकची पहिल्या पानाची स्पष्ट झेरॉक्स, जमिनीचा 7/12 उतारा, स्वयंघोषीत पेरणी प्रमाणपत्र, जर कुळासाठी लाभ घ्यावयाचा असेल तर भाडेपट्टी करार असलेला शेतकर्‍याचा करारनामा इत्यादी. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना एैच्छिक करण्यात आली आहे. रब्बी पिकांचा विमा अतरविण्याची अंतीम तारीख रब्बी ज्वारी (बागायत व जिरायती) 30 नोव्हेंबर 2021 अशी आहे. तर गहू (बा.) हरभरा व रब्बी कांदा यासाठी 15 डिसेंबर 2021 अशी आहे.

बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी बँकेत जाणे टाळावेअर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकर्‍यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून गाव पातळीवर अधिकची सुविधा म्हणून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राव्दारे/महा ई सेवा केंद्राव्दारे सदर योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी पिक विमा भरण्यासाठी शक्यतो बँकेत जाणे टाळावे.

शेवटच्या दिवसाची वाट पाहू नयेपिक विमा भरण्यासाठी काही अडचणी उद्भवल्यास संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. सर्व ग्राहक सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशीही 24 तास सुरु राहतील. त्यामुळे शेतकर्‍यांने लवकर विमा भरण्याची प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी. विमा हप्ता भरण्यासाठी शेतकर्‍यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता विमा भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी म्हटले आहे. echo adrotate_group(1);