सोनू सूदला भाजपाशी जोडण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचं शिवसेनेला उत्तर…

महाराष्ट्र राजकारण

भाजपा खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदवर टीका करताना अप्रत्यक्षपणे भाजपाशी संबंध जोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांना उत्तर देताना शिवसेनेचे आभार मानले आहेत. चांगली कामं करणारे भाजपामध्येच आहेत असा शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणासाठी भाजपाकडून ट्रकमधून मदत पाठवण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, “आम्ही जेव्हा जलायुक्त शिवारचं काम करायचो तेव्हा नाम संस्था आणि आमीर खान मदत करायचे. आम्ही हेवादावा केला नाही. ते सरकारला मदतच करत होते. त्यांचं आम्ही कौतुकच केलं. जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे आणि त्यांना मदतही केली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. अशा बाबतीत राजकारण करणे हे चुकीचे आहे”.

Tagged