pistal

क्राईम

शस्त्र परवानाधारकांसाठी मोठी बातमी

By Shubham Khade

November 26, 2021

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

बीड : जिल्ह्यात एकूण 1 हजार 217 शस्त्र परवानाधारक आहेत. त्यांना निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत.

जिल्ह्यात 5 नगरपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. तसेच, ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या काळात आचारसंहिता क्षेत्रात शस्त्रे बाळगता येत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आचारसंहिता क्षेत्र संबंधित परवानाधारकांना शस्त्रे तत्काळ पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.