Site icon कार्यारंभ लाईव्ह

सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; पीडित गर्भवती!

atyachar

atyachar

echo adrotate_group(3);

echo adrotate_group(7);

बीड दि.30 : अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेला आठवडा उलटतो की नाही तोच सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात घडली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.29) रात्री सख्ख्या भावासह, चुलत भाऊ व अन्य एकावर कलम 376 (2) (I) (N) (F),354 (अ) 34 भादवि सह (N) 3, 8, 12 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.echo adrotate_group(5);

नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी एकास अटक केली आहे. घटनास्थळी उपअधीक्षक संतोष वाळके, सपोनि.योगेश उबाळे यांनी भेट दिली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार राजपूत हे करत आहेत. इतर दोन आरोपींचा ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे घरातही स्त्री असुरक्षित असल्याचे चित्र आहे.echo adrotate_group(9); echo adrotate_group(1);

Exit mobile version