paithan corona possitive

कोरोना अपडेट

ब्रेकिंग न्यूज : बीड जिल्ह्यातील ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण

By Shubham Khade

December 03, 2021

बीड : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशात बीड जिल्ह्यातील आमदार विनायकराव मेटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःहून ही माहिती दिली असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आमदार विनायक मेटे यांनी फेसबुक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, कोरोना कालावधीमध्ये मागील दोन वर्षांपासून आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने कोरोनाच्या संसर्गापासून दूर होतो. परंतु शुक्रवारी सकाळी माझी आर.टी.पी.सी.आर. टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. माझी तब्येत चांगली आहे.काळजी नसावी. परंतु, मी कोरोना पॉझिटिव झाल्याने मागील दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व आपली तसेच आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असल्याने यातूनही लवकरच बाहेर पडेन, असे आमदार विनायक मेटे यांनी म्हटले.